Thursday, December 4, 2014

मृत्यूत कोणी हासे - आरती प्रभू

मृत्यूत कोणी हासे, 
मृत्यूस कोणी हसतो..
कोणी हसून मरतो, 
मरत्यास कोणी हसतो..!
 
अश्रूत कोणी बुडतो , 
लपवीत कोणी अश्रू ;
सोईनुसार अपुल्या, 
कोणी सुरात रडतो...
 
जनता धरी न पोटी, 
साक्षात जनार्दनाला..
जनतेस कोणी पोटी, 
पचवून हार घेतो..!!
 
विजनी कुणी सुखी अन, 
भरत्या घरात कोणी ;
वनवास भोगणारा, 
दुःखात शांत गातो...!
 
कोणी जूने पुराणे, 
विसरे न पीळ धागे
कोणी तुटून पडला, 
सगळ्याच पार जातो ..
 
कोणास मेघपंक्ती दाटून गच्च येता
लागे तहान, 
कोणी नाचून तृप्त होतो...!!!
कोणी दिव्याशिवाय, 
होतो स्वतःच दीप
कोणी दिव्यावरी अन टाकून झेप देतो..
*आरती प्रभू

0 comments:

Post a Comment